मुंबई (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अवमानकारक वक्तव्य करीत आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयावर राहुल गांधी जर त्यांच्या भूमिकेवर ठाम असतील तर त्यांनी महाराष्ट्रात शिवसेना सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनं सुद्धा काँग्रेस सोबतची युती तोडावी. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चालविलेला सावरकरांचा अवमान शिवसेनेला सहन होत नसेल तर त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावं, असं आवाहन आठवले यांनी मुंबईत जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात केलं आहे.






