पुणे : पीएमपीएमएलच्या ताफ्यात येत्या 20 तारखेपर्यंत 10 ई-बसचा समावेश होणार आहे. तसेच 20 तारखेपासून पुढील काळात आणखी काही नव्या सीएनजी आणि ई-बसदेखील रस्त्यावर धावताना दिसतील, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’ प्रशासनाकडून देण्यात आली.

सध्या ‘पुणे महानगर परिवहन महामंडळा’च्या काही बस अत्यंत वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएल प्रशासन नव्या बस खरेदीच्या प्रयत्नात असून, लवकरच पीएमपीएमएलच्या ताफ्यात नव्या बस दाखल होणार आहेत.

हैदराबाद येथून ‘वॉलेक्ट्रा कंपनी’च्या या ई-बस पीएमपीएमएलच्या बस ताफ्यात सामील होणार आहेत. तर प्रशासनाकडून डिसेंबर 2019 पर्यंत 940 नव्या बस खरेदी केल्या जाणार आहेत. ज्यात 500 ई-बस आणि 440 सीएनजी बसचा समावेश असेल.