मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही नव्यानं आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या तिप्पट होती. काल ४ हजार ३५९ नव्या रुग्णांची नोंद झाली. १२ हजार ९८६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर ३२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ७८ लाख ३९ हजार ४४७ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ७६ लाख ३९ हजार ८५४ रुग्ण बरे झाले. तर १ लाख ४३ हजार ३८७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ५२ हजार २३८ सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४५ शतांश टक्के झालं आहे. तर मृत्यूदर १ पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे.राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेले २३७ रुग्णा आढळले. त्यापैकी ११ रुग्ण पुणे महानगरपालिका क्षेत्रात, तर २२६ रुग्ण मुंबईत आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत ३ हजार ७६८ ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी ३ हजार ३३४ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.