नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यावर्षीच्या पद्म पुरस्कारांमधे श्रीलंकेच्या दोन महिलांना भारत आणि श्रीलंकेमधील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल स्थान मिळालं आहे. देशबंधू डॉक्टर वजीरा चित्रसेना यांना नृत्यातल्या, तर दिवंगत प्राध्यापक इंद्र दसनायके यांना हिंदी साहित्यातल्या कार्याबद्दल पद्मश्री प्रदान करण्यात आला.
कंदयान आणि ओडिसी नृत्यप्रकारात डॉक्टर चित्रसेना यांनी महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. श्रीलंकेचा देशबंधू हा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार त्यांना श्रीलंका सरकारनं प्रदान केला आहे. दिवंगत प्राध्यापक सदनायके यांनी केलनिया विद्यापीठात हिंदी प्राध्यापिका म्हणून मोठं कर्तृत्व आहे. श्रीलंकेच्या शैक्षणिक संस्थांमधे हिंदीचा प्रसार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. श्रीलंकेत 80 हून अधिक शैक्षणिक संस्थांमधे हिंदी भाषा शिकवली जाते.