नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष डेविड मालापास यांनी आज नवी दिल्ल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मालापास चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.
नीती आयोगाच्या वतीनं नवी दिल्लीत आयोजित एका व्याख्यान मालेत विकासात आर्थिक क्षेत्राची भूमिका या विषयावर मालापास यांनी व्याख्यानही दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही यावेळी उपस्थित होते.
मालापास यांच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या शिष्टमंडळानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याही आज चर्चा केली. यावर्षी एप्रिल महिन्यात जागतिक बँकेचं हंयक्षपद स्वीकारल्यानंतर मालापास यांचा पहिलाच भारत दौरा आहे.