नवी दिल्ली : इराकची राजधानी बगदार इथं सरकार विरोधी निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधूराचा वापर करावा लागला. इथले कायदेतज्ञ, निदर्शकांच्या मागण्या, मंत्रिमंडळाचे निर्णय तसंच सुधारणांची अंमलबजावणी याबाबत लवकरच चर्चा करणार आहेत.
गेल्या १ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सरकारचिरोधी निदर्शनांत सुमारे २०० जणांचा मृत्यू झाला असून हजारहून अधिक जण जखमी झाले आहेत.