मुंबई : मुंगुस या वन्य प्राण्याच्या केसांपासून तयार केलेले १३ हजार २०६ चित्रकलेचे ब्रश ठाण्यात मीरारोड इथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं.
आरोपीला एक दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे चित्रकलेच्या ब्रशचा छुपा व्यापार उघडकीला आला आहे. पुढील तपास वन क्षेत्रपाल, ठाणे करत आहेत.