मुंबई : औरंगाबाद इथं २२ ते २४ नोव्हेंबर याकाळात बौद्ध धम्मगुरू दलाई लामा यांच्या उपस्थितीत जागतिक धम्म परिषद होणार आहे.
या परिषदेला श्रीलंका, नेपाळ, कंबोडीया, जपान, व्हिएतनाम, म्यांमा, थायलंडसह १३ देशातून मान्यवर बौद्ध भिख्खू उपस्थित राहणार आहेत. ऑल इंडिया भिख्खू महासंघानं आज ही माहिती दिली.