मुंबई : विधानसभा निवडणुकामध्ये भाजपा उमेदवाराचा प्रचार केल्याचा ठपका ठेवत, नंदुरबारमधल्या नवापुर नगरपालिकेच्या तीन नगरसेवकांची काँग्रेस पक्षानं हकालपट्टी केली.

नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी ही कारवाई केली आहे. हकालपट्टी केलेल्या नगरसेवकांमध्ये गिरीश गावित, नगरसेविका मंगला सैन, तर स्विकृत नगरसेवक बंटी चंदलानी यांचा समावेश आहे.