नवी दिल्ली : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या ३१ ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हा दिवस भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी देशभरात लाखो लोक विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातमधे केवडीया इथे भेट देणार असून ‘स्टॅचू ऑफ युनिटी’ या सरदार पटेल यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर ‘एकता धाव’ या कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवणार आहेंत.
आकाशवाणीवरून गेल्या महिन्यात प्रसारित झालेलया ‘मन की बात’ कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी ”एक भारत श्रेष्ठ भारत” हे भारतीय जनतेचं सामायिक स्वप्न असून, त्यासाठी एकता कायम राहण्याच्या उद्देशानं दरवर्षी ३१ ऑक्टोबरला ‘एकता धाव’ आयोजित करणार असल्याचं सांगितलं होतं.