नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत सायना नेहवालनं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. आज दुसऱ्या फेरीत तिने दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा 25-23, 21-12 असा थरारक लढतीत पराभव केला.
सायनानं पहिल्यांदाच यंगवर मात केली आहे. यापुढच्या फेरीत तिच्या समोर ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती स्पेनची कॅरोलिना मरीनचं आव्हान आहे.