नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या संकटाच्या संदर्भात भारतानं केलेल्या प्रवास निर्बंधांची माहिती देण्यासाठी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासाने चोवीस तास सुरु राहणारी हेल्पलाईन स्थापन केली आहे. या दोन्ही हेल्पलाईनचे क्रमांक २०२ – २१३ -१३६४ आणि २०२ – २६२ – ०३७५ असे आहेत. या बरोबरच नागरिक CONS4.WASHINGTON@MEA.GOV.IN या संकेतस्थळावरही संपर्क साधू शकतील.

भारताने बुधवारी काही विशेष श्रेणी वगळता सर्व प्रकारचे व्हिसा रद्द केले आहेत. हे व्हिसा १३ मार्च च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून रद्द केले आहेत. सरकारने सर्व भारतीयांना अनावश्यक परदेशी प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत.