नवी दिल्ली : प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राष्ट्रकुल प्रमुख म्हणून प्रिन्स ऑफ वेल्स यांची निवड झाल्याबद्दल, राष्ट्रपतींनी त्यांचे अभिनंदन केले.
भारत आणि ब्रिटन हे ऐतिहासिक बंध, लोकशाही मूल्ये, वैविध्यपूर्ण समाजाप्रती आदर या मूल्यांनी बांधले गेलेले नैसर्गिक भागीदार आहेत. जगातल्या अग्रगण्य लोकशाही या नात्याने जगापुढच्या अनेक आव्हानांची प्रभावी दखल घेऊन त्यावर तोडगा करण्यासाठी दोन्ही देशाचे एकत्रित मोठे योगदान हवे असे राष्ट्रपती म्हणाले.
आयुर्वेद संशोधनासाठी प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या पाठिंब्याबाबत राष्ट्रपतींनी प्रिन्स यांचे आभार मानले.