नवी दिल्ली : देशात उपलब्ध संशोधक आणि तंत्र क्षेत्रातले तज्ञ यांचे अद्ययावत संरक्षण उत्पादन आरेखन आणि विकासासाठी योगदान राहण्याच्या दृष्टीने डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने एक कार्यशाळा आयोजित केली होती. डीआरडीओ आणि शैक्षणिक संस्था यामध्ये संवाद राहण्याच्या दृष्टीने नामवंत शिक्षणतज्ञांनी यावेळी अनेक कल्पना सुचवल्या. संशोधनाचे संरक्षण उत्पादनात थेट योगदान राहण्याच्या दृष्टीने विविध कल्पनांवर या कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.

संरक्षण संशोधन आणि विकासात कल्पकतेसाठी मोठा वाव असून हे केवळ संशोधन आणि विकास संस्थेपुरताच तो मर्यादित नाही. हे लक्षात घेऊन डीआरडीओने विविध विद्यापीठांमध्ये आठ तंत्रज्ञान केंद्र उभारली आहेत. यासंदर्भात डीआरडीओच्या प्रयत्नांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रशंसाही केली आहे.