नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमध्ये,बीजिंगमधल्या भारतीय दूतावासानं काल अनिवासी भारतीय दिवस साजरा केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं अनिवासी भारतीय उपस्थित होते.

अनिवासी भारतीयांच्या ज्ञानचा आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा उपयोग व्हावा यादृष्टीनं, या अनिवासी भारतीयांना आपल्या मातृभूमीशी जोडून ठेवण्यासाठी भारत सरकारनं अनेक उपक्रम राबवले असं, बीजिंगमधले भारताचे राजदूत विक्रम मिसरी यांनी यावेळी सांगितलं.

चीनमध्ये वास्तव्याला असणाऱ्या अनिवासी भारतीयांनी स्वतः नोंदणी करून दूतावासाच्या संपर्कात राहावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी भारतीय समुदायानं सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केलं.