नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय नौदलासाठी जहाजविरोधी, विमानविराधी, तसंच किना-यावर मारा करणा-या १ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या नाविक तोफा विकण्याच्या निर्णयाबाबत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकी काँग्रेसला अधिसूचित केलं आहे.

नाविक तोफांच्या खरेदीमुळे भारतीय नौदलाची मारक क्षमता वाढणार आहे. या तोफा तसंच त्याच्याशी संबंधित साधनांच्या खरेदीसाठी १ अब्ज २१ कोटी अमेरिकी डॉलर्स खर्च येणार आहे. भारत या क्षमतेचा वापर त्या क्षेत्रातल्या धोक्यांना तोंड देण्यासाठी आणि आपल्या मायभूमीची सुरक्षा मजबूत करण्यासाठी करेल, असं अमेरिकेच्या सुरक्षा सहकारी यंत्रणेनं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे.