नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांना एका मासिकाच्या स्तंभलेखिकेच्या लैंगिक शोषण प्रकरणात प्रथमच दोषी धरण्यात आले आहे. गेले दोन आठवडे चाललेल्या एका दिवाणी खटल्याची सुनावणी आणि तीन तास चर्चा केल्यानंतर न्यायमंडळाने ट्रंप यांना या प्रकरणात लैंगिक छळ आणि मानहानीसाठी जबाबदार धरलं.
शिक्षेपोटी ट्रंप यांनी स्तंभलेखिकेला पन्नास लाख डॉलर्स भरपाई द्यावी असा आदेश न्यायमंडळानं दिला. 1995 मध्ये ही घटना घडली होती. या खटल्यातील आरोप करणारी महिला कोण आहे याची आपल्याला कोणतीही कल्पना नाही असा दावा डोनल्ड ट्रंप यांनी केला होता आणि न्यायमंडळाचा निर्णय अवमानकारक असल्याचं म्हटलं आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचं ट्रंप यांच्या वकिलांनी सांगितलं.