नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनने आपल्या किनारपट्टीच्या कायद्यात बदल केला असून यामुळे पहिल्यांदाच परदेशी जहाजांवर गोळीबार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनच्या सर्वोच्च विधानमंडळातील नॅशनल पीपल्स कॉंग्रेसच्या स्थायी समितीने काल हा कायदा मंजूर केला. या कायद्यामुळे सागरी हद्दीच्या मुद्यावरून शेजारी देशांशी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
२०१८ मध्ये चीनच्या लष्कराने सागरी विभागाचा ताबा घेतल्यानंतर दोन वर्षांनी हा कायदा आणण्यात आला आहे. पूर्व चीन समुद्रात जपान आणि दक्षिण चीन सागरातील अनेक आग्नेय आशियाई देशांसमवेत चीनचा सागरी सार्वभौमत्व वाद आहे.