नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलंम्पिकसाठी भालाफेकीत नीरज चोपडानं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दक्षिण आफ्रिकेत अँथलेटिक्स सेंट्रल नॉर्थ ईस्ट स्पर्धेत नीरजनं 87 पूर्णांक 86 शतांश मीटर अंतरावर भाला फेकल्यानं तो यंदाच्या ऑलंम्पिकसाठी पात्र झाला आहे.

या ऑलंम्पिक स्पर्धेत स्थान मिळवण्यासाठी 85 मीटरपर्यंत भाला फेकणं आवश्यक होतं. रोहित यादवनं 77 पूर्णांक 61 शतांश मीटर अंतरावर भाला फेकला.