नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पीएफआय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया ही संघटना आणि तिच्याशी संबंध असलेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या सात पदाधिकाऱ्यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं समन्स जारी केलं आहे.

पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाउंडेशनच्या सात पदाधिकाऱ्यांना आज नवी दिल्ली इथं चौकशी अधिकाऱ्यासमोर हजर राहायला सांगितलं असल्याची माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

उत्तर प्रदेश आणि देशाच्या इतर भागात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या हिंसक निदर्शनांशी पीएफआयचे कथित आर्थिक संबंध असल्याचं आढळल्यावर ही कारवाई केल्याचं सक्तवसुली संचालनालयानं म्हटलं आहे.

मात्र हे आरोप निराधार असल्याचा दावा पीएफआयनं केला आहे. २०१८ मध्ये पीएमएलए कायद्यांतर्गत पीएफआयवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.