नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तामिळनाडूमधे आणखी दोन सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं उभारायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर विजय भास्कर यांनी काल वार्ताहरांना ही माहिती दिली.

अरियालूर आणि नव्यानं निर्माण करण्यात आलेल्या कलाकुरुची या दोन जिल्ह्यांमधे ही महाविद्यालयं उभारण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात सरकारनं परवानगी दिलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 11 गेली आहे.