नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षाखालच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ७४ धावांनी पराभव केला.

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी बोलावल्यानंतर, भारतानं ५० षटकात ९ बाद २३३ धावा केल्या. त्यानंतर विजयासाठी २३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ आकाश सिंग आणि कार्तिक त्यागीच्या भेदक मा-यासमोर १५९ धावात गारद झाला. कार्तिक त्यागीनं चार, तर आकाश सिंगनं तीन गडी बाद केले.