बारामती : बारामती येथील उप विभागीय अधिकारी यांचे अधिनस्त मुख्य इमारती मधील उपहारगृह आणि 3 गाळे करार पध्दतीने चालविण्यात देण्यात येणार आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व परिसर दररोज स्वच्छ करणेचे अटींवर 11 महिन्यांच्या अटींवर उपहारगृह व गाळे कराराने देण्याचे नियोजित आहे. याकरीता इच्छुकांकडून जाहिर सिलबंद निवीदा अटी व शर्तीवर मागविणेत येत आहेत. या निवीदा निवीदेच्या तारखेपासून 7 दिवसांत म्हणजेच दिनांक 20 जून 2019 अखेर उपविभागीय अधिकारी,बारामती यांचे कार्यालयात सिलबंद समक्ष सादर करण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये उपहारगृह (Canteen) 65.08 चौ.मी करीता मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसराची दररोज संपूर्ण स्वच्छता करणेकरिता (गार्डन देखभाल दुरुस्तीसह) किमान 4 मजूर व आवश्यक ते साहित्य पुरविणे.गाळा क्र.01 व 02 चे 6.36 चौ.मी. करीता मुख्य प्रशासकीय इमारत, अभियांत्रिकी भवन व कृषि भवन या इमारतीची दररोज संपूर्ण स्वच्छता करणेकामी (प्रसाधनगृहांसह) किमान 5 सफाई कामगार व स्वच्छतेकामी आवश्यक साहित्य पुरविणे तर गाळा क्र.3 चे 32.76 चौ.मी करीता मुख्य प्रशासकीय इमारत व संपूर्ण परिसरास 24 तास सुरक्षा व्यवस्था पुरविणे. किमान 3 सुरक्षा रक्षक पुरविणे अशा अटी असून इतर अटी शर्ती कार्यालयाचे सूचना फलकावर प्रसिध्द करण्यात आल्याचे उप विभागीय अधिकारी, बारामती उपविभाग, बारामती यांनी कळविले आहे.