नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातल्या मालगाव इथं साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या जैनमूर्ती सापडल्या आहेत. भगवान महावीर मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. त्यावेळी पायाचे खोदकाम करताना एकूण १५ पुरातन मूर्ती आढळून आल्या. त्यातल्या काही मूर्ती साडेपाचशे वर्षांपूर्वीच्या असल्याचा अंदाजअभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
यामध्ये भगवान पार्श्वनाथ यांच्या ५, भगवानचंद्रप्रभू यांच्या २, पंच परमेश्वर भगवानाची एक, क्षेत्रपाल महाराजांची एक आणिपद्मावती मातेची एक मुर्ती सापडली आहे. याशिवाय काही छोट्या मूर्ती देखील सापडल्या आहेत.