नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला तोंड देण्यासाठी चीनला सर्वतोपरी मदत करण्याची तयारी भारतानं दाखवली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. चीनवरच्या या संकट काळात भारत चीनच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे.
हुबेई प्रांतातून भारतीयांना परत आणण्याकामी चीननं केलेल्या मदतीची त्यांनी प्रशंसा केली आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मरण पावलेल्यांबद्दल भारतानं दुःख व्यक्त् केलं आहे.