नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्यापासून १८ दिवस ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेला प्रारंभ होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या मोहिमेचं आयोजन केलं असून ती येत्या २८ तारखेपर्यंत चालणार आहे.
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात ही मोहीम सुरु राहणार असून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ च्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन दिलं जाणार आहे. २०१६ मधे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहीमेचं उद्धाटन करताना या मोहीमेमुळे विविध राज्यांमधल्या जनतेचे परस्परसंबंध दृढ करणं हा मोहीमेचा उद्देश असल्याचं म्हटलं होतं.
३६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा उच्च सांस्कृतिक वारसा, खाद्यसंस्कृती, हस्तव्यवसाय, तसंच रुढीपरंपरांना प्रोत्साहन देणं ही ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ मोहीमेची मूळ संकल्पना आहे.