नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयएनएक्स मिडीया घोटाळा प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना दिल्ली उच्च न्यायालयाने 13 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.
सक्तवसूली संचालनालयाने केलेली एक दिवसाच्या कोठडीतल्या चौकशीची मागणी न्यायालयानं फेटाळली आहे. चिदंबरम यांना आवश्यक ती औषधं, पाश्चात्य प्रसाधनगृह सुविधा, सुरक्षा आणि स्वतंत्र कोठडी द्यावी, असे निर्देशही न्यायालयानं तिहार कारागृहाच्या अधिका-यांना दिले आहेत.