नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्या परदेशी नागरिकांनी १५ जानेवारी नंतर चीनला भेट दिली असेल, अशांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही असं, उड्डाण नियामक, नागरी उड्डाण महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे.

महासंचालनालयानंसर्व विमान कंपन्यांना या संदर्भातले निर्देश जारी केले आहेत. याशिवाय पाच फेब्रुवारीपूर्वी चीनच्या नागरिकांना दिलेले व्हीसाही रद्द केले आहेत. मात्र यानियमातून विमानात कार्यरत सर्वच देशांच्या कर्मचाऱ्यांना वगळलं असल्याचंही महासंचालनालयानं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान एअर इंडिया आणि इंडिगो या भारतीय विमान कंपन्यांनी चीनमध्ये ये-जा करणारी उड्डाणं रद्द केली आहेत. भारतात आत्तापर्यंत केरळमधल्या तीन नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे