मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात पेरमिलभट्टी जंगलात आज सकाळी पोलीस दलाच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ५ नक्षलवाद्यांना अटक केली आहे. आणि त्यांच्याकडून ३ शस्त्रे आणि काही साहित्यही ताब्यात घेतलं आहे.

हे सर्व नक्षलवादी छत्तीगडमधल्या नारायणपूर इथले आहेत. या नक्षलवाद्यांच्या विरोधात लाहेरी उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.