नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केवायसी निकषांची पूर्तता न केल्याबद्दल एचडीएफसी बँकेला एक कोटी रुपयाचा दंड रिझर्व्ह बँकेनं ठोठावला आहे. आयपीओच्या बोलीसाठी खातेधारकांनी उघडलेल्या एकोणचाळीस चालू खात्यांच्या आवश्यक तपासणीत एचडीएफसीनं हेळसांड केल्याचं २०१६-१७ च्या पर्यवेक्षकीय मूल्यांकनात स्पष्ट झालं.
या खात्यांमधले व्यवहार ग्राहकांच्या घोषित उत्पन्नाशी विसंगत आहेत, असं आरबीआयच्या पत्रकात म्हटलं आहे.