नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीनमधल्या वुहान शहरात झालेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी एअर इंडियाचं विशेष विमान आज दिल्लीहून रवाना झालं.

या विमानासोबत जाणारं पथक विशेष वैद्यकीय कीट, मास्क आणि इतर आवश्यक उपकरणांनी सज्ज आहे. या पथकातले सदस्य वुहानमधे पोचल्यावर विमानातून उतरणार नाहीत. चीनमधून, ज्यांच्यात कोरोना विषाणूच्या बाधेची लक्षणं आढळणार नाहीत, त्यांनाच