नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धाच्या उपांत्य सामन्यात भारताचा जलद गोलंदाज आकाशसिंग याला जाणीवपूर्वक कोपरानं धक्का दिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज सॅम फॅनिंग याला आयसीसीनं दंड ठोठावला आहे.
आयसीसीच्या आचारसंहितेच उल्लंघन केल्याप्रकरणी फॅनिंग दोषी आढळल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. फॅनिंगनंही आपला गुन्हा मान्य करत, सामनाधिका-यांनी त्याच्यावर लादलेल्या प्रतिबंधाचा स्वीकार केला आहे.