नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील सर्वात उंच शिखर एका भारतीय महिलेने सर केले आहे. भावना डेहरिया यांनी ऑस्ट्रेलियातील माऊंट कोझिस्को या शिखरावर आज यशस्वी चढाई केली. या शिखराची उंची २२२८ मीटर आहे. गेल्या दिवाळीत त्यांनी माऊंट किलीमांजारोवर चढाई केली होती.
यापूर्वी त्यांनी माऊंट एव्हरेस्टही सर केले आहे. डेहरीया या मूळच्या मध्यप्रदेशातील असून या मोहिमेसाठी मदत केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे आभार मानले आहेत.