नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि या कायद्याला समर्थन दर्शविण्यासाठी लातूर जिल्ह्यात बोरी इथं आज सकाळी तिरंगा रॅली आयोजित करण्यात आली होती.
पोलिस बंदोबस्तात निघालेल्या या रॅलीत बोरी आणि आणि परिसरातल्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अहमदनगर जिल्ह्यात राजूर तालुक्यातल्या अकोले इथं देखील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढून आज राजूर परिसरातल्या नागरिकांनी या कायद्याचं समर्थन केलं.