नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आर्थिक वर्षात दररोज ३० किलोमीटर लांबीचे महामार्ग बांधण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली.
२०१८-१९ या वर्षात हे प्रमाण २४ पूर्णांक ३७ शतांश किलोमीटर तर डिसेंबर महिन्यात १९ पूर्णांक २० शतांशमधे ते २५ पूर्णाक २३ शतांश किलोमीटर होतं. असंही या उत्तरात म्हटलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमधे एकूण २ हजार एकशे पंचावन्न किलोमीटर लांबीचे रस्ते बांधल्याचंही त्यांनी सांगितलं.