नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३ जण जखमी झालेत. बनावट बॉम्ब अंगावर लादलेल्या एका दहशतवाद्याला स्कॉटलंड यार्डच्या अधिकाऱ्यांनी यावेळी ठार केलं. दहशतवाद विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

दहशतवादाशी निगडीत साहित्य बाळगणे आणि त्यांचा प्रसार करण्याच्या गुन्ह्याखाली तीन वर्ष आणि चार महिन्यांच्या कैदेनंतर नुकतीच या दहशतवाद्याची सुटका करण्यात आली होती. सुदेश ममूर फराझ अम्मन असं या दहशतवाद्याचं नाव असल्याचं ब्रिटनमधल्या प्रसारमाध्यमांनी सांगितलं आहे. श्रीलंकेतला राहणारा असणारा अम्मन लंडनमध्ये शिकायला आला होता.

प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी दहशतवाद्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याच्या निर्णयाचा पुनरुच्चार केला आहे. दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या योजनेतल्या आमुलाग्र बदलांची घोषणा आज करणार असल्याचं ते म्हणाले.