नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अफगाणिस्तानमधे काबूल इथं, एका बंदुकधा-यानं महिला बालकांसह २७ जणांना ठार केलं. याशिवाय २९ जण जखमी झाले.
१९९५ मध्ये तालिबान्यांकडून मारले गेलेले अल्पसंख्यक नेते अब्दुल अली मझारी यांच्या स्मृति कार्यक्रमात ही दुर्घटना घडली. या घटनेचा अध्यक्ष अश्रफ घनी यांनी मानवतेच्या विरोधातला गुन्हा अशा शब्दात निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्याशी संबंध नसल्याचं तालिबान्यांनी स्पष्ट केलं आहे.