नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चार दोषींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याच्या निर्णयाविरोधात, केंद्र सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीचा निर्णय,  दिल्ली उच्च न्यायालयानं काल राखून ठेवला.

सगळ्या पक्षकारांचा युक्तिवाद संपल्यानंतर यासंदर्भात निर्णय दिला जाईल असं न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी काल सुनावणीदरम्यान सांगितलं. न्याय मिळण्यासाठी उशीर होता कामा नये, त्यामुळे सर्वांची फाशीची शिक्षा लांबवण्यात येऊ नये असा युक्तिवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी केला.