नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमध्ये तिसऱा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला असून विषाणूची बाधा झालेल्या या तिघांनाही इतरांपासून  पूर्णपणे वेगळं ठेवण्यात आलं आहे. तिघांचीही प्रकृती स्थिर आहे, यातला दुसरा रुग्णं हा वुहानमधला विद्यार्थी असून, तो पहिल्याच्या संपर्कात होता असं केंद्रीय आरोग्य विभागानं स्पष्टं केलं आहे.

चीनचा प्रवास टाळावा तसच प्रवास करावा लागलाच तर, चाचण्या पूर्ण होईपर्यंत चीनमधून येणाऱ्या लोकांचा, तसंच १५ जानेवारीपासून चीनमधून भारतात आलेल्या लोकांचा, इतरांशी संपर्क होऊ देऊ नये अशी नवी मार्गदर्शक सूचना सरकारनं जारी केली आहे.

चिनी पारपत्रं धारकांसाठी असलेली ई-व्हिसा सुविधाही सरकारनं तात्पुरती स्थगित केली आहे. चिनी नागरिकांना यापूर्वी जारी केलेले ई-व्हिसा सुद्धा तात्पुरते अवैध ठरवण्यात आले आहेत.

भारतात येणं अत्यावश्यकच असलेल्या चिनी नागरिकांनी, बीजिंग मधल्या भारतीय दूतावासाशी, किंवा ग्वांग्झू आणि शांघाय मधल्या उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहनही केंद्र सरकारनं केलं आहे.

वुहान मधून भारतात आणलेल्या ६४५ जणांना मणेसर आणि आय टी बी पी चावला छावणी इथल्या दोन केंद्रांमध्ये सगळ्यांपासून वेगळं ठेवण्यात आलं आहे. मणेसरच्या केंद्रातल्या एका संशयित रुग्णाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं, आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे.