नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या भेटीवर आलेले श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. राजपक्षे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत. राजपक्षे यांचे भारतात आगमन झालं, त्यावेळी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे यांनी त्यांचं दिल्ली विमानतळावर स्वागत केले.

राजपक्षे यांचे आज राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागत केले जाईल. राजपक्षे राजघाट इथल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना आदरांजली वाहणार आहेत.

राजपक्षे आपल्या भारत भेटीदरम्यान ते वाराणसी, सारनाथ, बोधगया, तिरुपती या ऐतिहासिक स्थळांनाही भेट देणार आहेत.राज्यपक्षे यांनी श्रीलंकेचं प्रधानमंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच भारताच्या भेटीवर आले आहेत.