नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी शंभर दशलक्ष अमेरिकन डॉलर इतकी रक्कम अनामत म्हणून जमा करावी, असे आदेश ब्रिटनच्या न्यायालयानं दिले आहेत. अंबानी यांच्यासोबत झालेल्या कर्ज करारानुसार, त्यांच्याकडून येणं असलेल्या ६८० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स इतक्या रकमेची वसुली करावी अशी मागणी करणारी याचिका,चीनच्या तीन बँकांनी ब्रिटनच्या न्यायालयात दाखल केली आहे.

या याचिकेवर झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे निर्देश दिले. आपली मालमत्ता जवळपास शून्यावर आली असून, आपण संकटात असताना आपलं कुटुंबीय आपल्याला मदत करणार नाही, अशी परिस्थिती असल्याचा प्रतिवाद अंबानी यांच्यावतीनं करण्यात आला होता.

मात्र न्यायमूर्ती डेव्हिड वॉक्समन यांनी फेटाळला. ब्रिटिश न्यायालयाने दिलेल्या या आदेशाविरोधात अंबानी यांच्यावतीने अपील केले जाण्याची शक्यता आहे.