नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय संरक्षण विभागाचा द्वैवार्षिक फ्लॅगशिप म्हणजेच अत्यंत महत्वाच्या उपक्रमांपैकी एक असलेल्या डिफेन्स एक्स्पोच्या, उत्तर प्रदेशात लखनौ इथे भरलेल्या अकराव्या आवृत्तीचा आज समारोप होणार आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग या समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. सर्वसामान्य लोकांसाठी मात्र हे लष्करी साहित्य सामुग्रीचे प्रदर्शन उद्या दुपारपर्यंत खुले राहील.

संरक्षण विषयक विशेष करून हवाई क्षेत्रातल्या साहित्य सामुग्रीचे उत्पादक, प्रदर्शक आणि वेगवेगळ्या प्रतिनिधी मंडळांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती, यावेळच्या डिफेन्स एक्स्पो प्रदर्शनाची  वैशिष्ट्ये ठरली.