नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केरळमधील सबरीमला मंदिरातल्या भगवान अय्यप्पांच्या दागदागिन्यांची यादी आणि  मूल्यांकन अहवाल तयार करण्यासाठी  सर्वोच्च न्यालयानं केरळ उच्च न्यायालयाचे  सेवानिवृत्त न्यायाधीश सी. एन. रामचंद्रन नायर यांची नियुक्ती केली आहे.

या दागदागिन्यांसाठी पंडालम राज-परिवारातल्या  वेगवेगळ्या पंथांनी  दावे केले आहेत. केरळ सरकारचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी राज-परिवारातला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करावी अशी सूचना  न्यायाधीश एन.वी. रामना, अजय रस्तोगी आणि  वी. रामा सुब्रमण्यन यांच्या पीठानं केली  आहे.

सबरीमला मंदिर प्रशासनासंदर्भात एक मसुदा तयार करण्याकरता न्यायालयानं राज्य सरकारला चार आठवड्यांची मुदत दिली आहे.