मुंबई (वृत्तसंस्था) : सिंधुदुर्ग जिल्ह्याला कोल्हपूरशी जोडणाऱ्या प्रस्तावित सोनवडे घाट मार्गाचं काम तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी आज सोनवडे संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी पणदूर तिठा इथे मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला.

संघर्ष सेनेचे अध्यक्ष  महेंद्र नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या महामार्ग रोको आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.

सोनवडे घाट मार्गाचे काम तातडीने सुरु झाले नाही तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा नाटेकर यांनी यावेळी दिला.

या आंदोलनात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवडावच्या रांगणायुवा संघर्ष प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सुद्धा सहभागी झाले होते.