मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मराठवाड्यात जोमाने कामाला लागणार असल्याचे त्यांनी या पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितले.

माजी केंद्रीय मंत्री दिवंगत प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे निष्ठावंत आणि कट्टर शिवसैनिक सुहास दशरथे यांनीही आज मनसेत प्रवेश केला. दशरथे यांचा प्रवेश शिवसेनेसाठी धक्का मानला जात आहे.

भाजपाचे दिलीप बनकर यांनीही आज मनसेमध्ये प्रवेश केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुशंगाने या चौघांचा मनसे प्रवेश महत्वाचा असल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी सांगितले.

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातले मनसे कार्यकर्ते उद्या मुंबईत घुसखोरांविरुद्ध होणाऱ्या मोर्चासाठी रवाना झाले आहेत.