नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यातल्या सव्वाशे नवे बंकर बांधायला प्रशासनानं मंजूरी दिली आहे. पाकिस्तानाकडून वेळीअवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुनं, त्यांना आसरा मिळावा यासाठी हे बंकर बांधले जात आहेत.

कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्हे दोन जिल्हे सीमारेषेलगतच असल्यानं तिथे हे बंकर बांधले जातील. हे बंकर बांधण्यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.