नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांवर उपचार व पाठपुरावा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिम्पल ॲपचा आणखी ९ जिल्ह्यांमध्ये विस्तार करण्यात येणार आहे. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, पुणे, रत्नागिरी, ठाणे, पालघर, कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये आता ॲपचा वापर सुरू होईल. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे आदेश दिले आहेत.

सध्या ४ जिल्ह्यात याचा उपयोग सुरू आहे. याठिकाणच्या सुमारे सव्वा लाख रुग्णांची यावर नोंदणी करण्यात आलेली आहे.

रुग्णांच्या नोंदणीपासून पुढील ३० दिवसांपर्यंत पाठपुरावा या ॲपच्या माध्यमातून करण्यात येतो. या ॲपमध्ये नोंदणी केलेल्या रुग्णांची रक्तदाबाची तपासणी आणि औषधोपचार मोफत केले जातात. त्याचबरोबर त्यांना संपूर्ण महिनाभराच्या गोळ्यादेखील मोफत दिल्या जातात.