नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोर्तुगालचे राष्ट्रपती मार्सलो रेबेलो डी सुसा आज चार दिवसांच्या भारत दौ-यासाठी नवी दिल्लीत येत आहेत.
त्यांच्याबरोबर पोतुगालचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, परराष्ट्र सचिव आणि संरक्षण सचिव देखील असणार आहेत.
राष्ट्रपती मार्सलो प्रथमच भारत भेटीवर येत आहेत. या दौ-यादरम्यान उद्या राष्ट्रपती भवनात त्यांचं समारंभपूर्वक स्वागत केलं जाईल, त्यानंतर ते राजघाटाला भेट देतील.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर हैदराबाद हाऊस प्रतिनिधीमंडळ स्तरावरची चर्चा होईल.
राष्ट्रपती मार्सलो महाराष्ट्र आणि गोव्यालाही भेट देणार आहेत. गेल्या काही वर्षात भारत आणि पोर्तुगाल यांच्यात मैत्रीपूर्ण संबंधाना वेग आला आहे.
उभय देशांदरम्यान आर्थिक विज्ञान, सांस्कृतिक आणि शिक्षण क्षेत्रात सक्रीय सहकार्य वाढत आहे.