नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेचे प्रधानमंत्री महिंदा राजपक्षे आजपासून पाच दिवसाच्या औपचारिक भारत दौऱ्यासाठी नवी दिल्ली इथं येणार आहेत. ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.  वाराणसी , सारनाथ, गया  आणि  तिरुपती या धार्मिक स्थळांना देखील ते भेट देणार आहेत.

श्रीलंकेतल्या विविध प्रकल्पांसाठी ४ कोटी ५० लाख अमेरिकी डॉलरचं कर्ज देण्याची घोषणा गेल्या नोव्हेंबर मध्ये भारतानं केली होती. त्या संदर्भात देखील यावेळी  चर्चा होणार आहे.