नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणूकीला अनुकूल वातावरण तयार करण्यासाठीच्या प्रयत्नाअंतर्गत संयुक्त अरब अमिरातीनं भारताच्या संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून अमिरातीच्या गुंतवणूकीत कर सवलती मिळवल्या आहेत.
संयुक्त अरब अमिरातीकडून पायाभूत क्षेत्रात केल्या जाणार्या गुंतवणुकीवर या सवलती केंद्रीय आणि स्थानिक अशा दोन्ही करांमधे मिळणार आहेत.
एप्रिल-२०२१ पासून या सवलती लागू होतील. ३१ मार्च २०२४ पर्यंतच्या गुंतवणूक काळासाठी त्या लागू राहतील. मात्र त्यासाठी किमान तीन वर्ष गुंतवणूक कायम ठेवावी लागेल.